Rashtrapita Mahatma Gandhi

 

                    राष्ट्रपिता महात्मा गांधी 

               "आसा एक असाधारण हाडामासाचा माणूस पृथ्वी तलावर होवून गेला यावर विश्वास ठेवणंच कठीन आहे," अल्बर्ट आइंस्टाइन. 

                सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या आपल्या विचारांवर म. गांधीची श्रधा होती, तर गुलामगिरीत खितपत पडलेल्या व पारतंत्र्यात भरडलेल्या सर्वानाच गांधी हे स्वातंत्र प्राप्तीचे एक साधन वाटत होते. म. गांधीची खूप मोठी फसवणुक या देशातील तरुणानी केली आहे. कारण गांधीवादा कडे त्यांनी फक्त स्वातंत्र्य प्राप्ति चे एक साधन म्हणून पाहिल. आज ही हेच होत आहे. आज देशात गांधीवादी चाळवळी नाममात्र शिल्लक आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या पोस्टरवर म. गांधीचे फोटो आहेत. पण त्यांची तत्वे कोणालाच नको आहेत. खरतर या राजकीय पक्षाच खर दूखन हे आहे की, गांधीना कोणत्या ही विचारधारेत बांधता येत नाही याच. देशातील सर्वच महान नेत्याना कोणत्या ना कोणत्या जाती-धर्माशी जोडता येत, जस की छ. शिवाजी महाराज मराठयांचे, बाबासाहेब अंबेडकर दलितांचे, टिळक ब्राम्हणाचे, म. फुले माळी समाजाचे, मौलाना आझाद मुसलमानाचे अस प्रत्येक महान व्यक्तित्वाला जाती-धर्माचे करुन राजकारण करता येत. पण म. गांधीच तस नाही. त्यांना कोणत्या ही विचारधारेत अडकवता येत नाही, की कोणत्याच धर्माचे ही बनवता येत नाही. त्यांचा स्वतंत्र झेंडा ही नाही की रंग ही नाही. इथे गांधीवाद हाच धर्म आहे. (धर्म म्हणजे धारण करणे). त्यामुळे सर्वच राजकीय विचार धारेंच हे सर्वात मोठ दूखन आहे. 

                 'लेनिन यांना समाजरचनेत क्रांति कार्याची होती, तर म. गांधीना ती प्रत्येकाच्या मनात करायची होती'. कारण मनात झालेली क्रांति शाश्वत असते तर समाजरचनेत झालेली क्रांति विषमता निर्माण करते. याचा अर्थ असा नाही की समाजरचनेत क्रांति व्हायला नको. सदृढ समाजासाठी ती ही गरजेची आहे. पण आपण बुद्धीप्रामान्यवाद सोडून दैववाद, धर्मवाद, जातीयवाद यामधे अडकून पडतो. आपली सत्य-असत्य यातील अंतर ओळखाण्याची सद्सद् विवेकबुद्धी हरवून बसते. आपण तर्कवाद सोडून खोट्या विचारधारांचे गुलाम होतो. या सर्वात अडकून पडलेले तरुण पाहिले की त्यांच्या दुर्देववादावर कीव करावीशी वाटते. याच एक सुंदर उदारण म्हणजे अलीकडच्या काळात झालेली सोशल मिडियाची क्रांति. यात तरुणाच्या बुद्धीच्या गुलामगिरीमूळे विचारांच्या दिवाळखोरीची करुणदृष्ये रोजच समाजामधे दिसत आहेत. त्याला कारण प्रत्येक गोष्ट तावून सुलावून आत्मसाद करायची असते, ही गांधीवादाची शिकवण, गांधीवादा पासुन फारकत घेतल्याने तरुणांना शिकायलाच मिळत नाही. याचे दूरगामी परिणाम समाजावर दिसत राहतील, यात मात्र कोणती शंका नाही. 

                आपल्या समाजामधे म. गांधी बद्दल आकस अगदी लहान वयातच तयार होतो. हे सर्व कुठून येतं माहित नाही. गांधीन वरील विनोद अगदी लहान वयात राजरोस पने चघळले जातात. पण हे होताना कोणी रोखत नाही, कारण गांधी फक्त २ ऑक्टोबरला च भेटतात ते ही सार्वजनिक सुट्टी म्हणून, त्यापेक्षा जास्त काही कोणाला माहितच नसाव. लहानपणीच हे बाळकडू प्यालेल्या तरुणाना म. गांधी बद्दल प्रेम कुठून येईल. त्यांच्या बद्दलचे अज्ञात पैलू जाणून घेतल्या खेरीज आपल मत परिवर्तन होने शक्य नाही. मग कोणते आहेत हे पैलू? नक्कीच जाणून घ्यायला हवेत ना? समजा एखादा समाजासाठी गरजेचा आणि आवशक असलेला येखादा मुद्दा तुम्हाला तुमच्या भागातील लोकांना पटवून द्यायचा आहे. किती लोक ऐकतील तुमचं? हेच दुसर्या गावातील लोक? दुसर्या भाषेतील लोक? हे थोड अशक्य वाटतय ना? आणि हेच जर तुमचा काहीच संबंध नसलेल्या दुसर्या देशातील लोकांबाबत असेल तर? हे खरच अधभुत म्हणाला हव ना? कारण म. गांधीनी भारता आधी द. आफ्रिकन लोकांच्या न्यायिक हक्कासाठी याच, त्यांच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा वापर करुन त्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. त्यांच्या याच त्रिसूत्रीचा वापर करुन त्यांचे अनुयायी भारतरत्न नेल्सन मंडेला हे द. आफ्रिकिन लोकांच्या हक्कासाठी आयुष्य भर लढत राहिले. त्यांच्या शांततेच्या कार्यासाठी त्यांना नोबेल ने सन्मानीत केले गेले. पण तरी ही आपल्याकडे काही लोक म. गांधीनी देशाला स्वातंत्र मिळवून दिल नाही, आसा अपप्रचार करत राहतात. 

               स्वत:ला महासता, प्रगतशील समजणार्या अमेरिकेला गुलामगिरी, वर्णवाद याने बरबटले होते. आफ्रिकन लोकांना गोरे अमेरिकन माणुसच समजत नसत. कृष्णवर्णीय लोकांना अत्यंत हिन व सापन्नपणाची वागणूक दिली जायची. या गुलामांची खरेदी विक्री राजरोस पने चालायची. या गुलामाना कोणते ही अधिकार नसायचे. पण हा होणारा अन्याय सहन न होणार्या बर्याच लोकांन मधे एक नाव होत ते म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग ज्यू. सुरवातीच्या काळात किंग हे हिंसक चाळवळींचा भाग होते. पण त्याच वेळी भारतात म. गांधी यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या परिवर्तनवादी अहिंसात्मक आंदोलनाची माहिती त्यांना मिळाली आणि ते म. गांधी च्या विचारांच्या प्रभावा खाली आले. त्यांनी १९५५ ते १९६८(अखेरच्या श्वासा पर्यंत) गुलामगिरी व वर्णवाद या विरुद्ध अहिंसात्मक आंदोलन उभारले. ते प्रचंड यशस्वी ही ठरले. अमेरिकेला गुलामगिरीच्या दुष्ट चक्रातुन मुक्त करण्यासाठी त्यांनी उभारलेल्या अहिंसात्मक आंदोलनासाठी १९६४ साली किंग यांना नोबेल देवून सन्मानीत करण्यात आले. हे गांधीवादा चे खरे यश आहे. 

               म. गांधीन सारखे होता येन ही कठीन गोष्ट आहे. पण प्रयत्न करत राहन ही कल्याणकारी गोष्ट आहे. जगात दूसरा गांधी होन अशक्य आहे. पण तरीही प्रती गांधी तयार झाले ते पाकिस्तान मधे. त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जात. ते म्हणजे खान अब्दुल गफार खान. स्वत:ला गांधीचे अनुयायी म्हणवनार्या खान यांनी आयुष्यभर त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थापना केलेला पक्ष आज ही तिथे गांधीवादी मार्गाने आंदोलने करतो. 

                    म. गांधीच नाव बुद्धां सोबत घेतल जात. या वरुनच त्यांची महानता प्रतीत होते. तरी ही म. गांधी हे आपल्याच देशात उपेक्षित होत चालले आहेत. त्यांचच नाव घेवुन मत मागणारे सत्तेत आले की सार विसरून जातात. आज ही भारताची जगातील ओळख म. गांधी चा भारत अशीच आहे. कोणता ही नेता त्यांच नाव न घेता देशाच प्रतिनिधित्व करुच शकत नाही. आज जगाला गांधीवादाची नितांत गरज आहे. जगान सर्व समस्या सोडवन्यासाठी गांधीवाद वापरला तर माणसाचे कल्याण आहे. नाही तर आपण बसलो आहोतच अणुयुद्धाच्या लटकत्या तलवारी वर. जिथून सही सलामत परत येन निव्वळ अशक्यच. 

                                          - अदिर

Comments

sunil said…
Happy Gandhi Jayanti
Unknown said…
सागर मे गागर .

Popular posts from this blog

EVERY 12TH STUDENT EVER

The Haunting Moments In A Hospital

Prototype 2.0 - The Humanoid